पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

महापालिका ही बांधकामे केव्हा पाडणार ? याकडे नागरिकांचे लक्ष

पिंपरी (पुणे) – इंद्रायणी नदी पात्रालगतची जाधववाडी चिखली येथील अनधिकृत बांधलेले २९ बंगले कायमस्वरूपी पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून त्यावर कारवाई केव्हा होणार ? पिंपरी-चिंचवड शहराच्या उत्तरेकडून वहाणार्‍या इंद्रायणी नदीच्या पूररेषेच्या आत भूमीचे तुकडे पाडून (प्लॉटिंग) जागेची विक्री केली. त्यावर नागरिकांनी बंगले, काही ठिकाणी ३ ते ४ मजली इमारती बांधल्या आहेत. याविषयी पर्यावरण कार्यकर्ते अधिवक्ता तानाजी गंभीरे यांनी ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडे तक्रार केली होती. लवादाने सर्व बंगले पाडण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाच्या विरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. न्यायालयाने ‘राष्ट्रीय हरित लवादा’चा दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.

संपादकीय भूमिका :

  • अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासन काय करते ? हे पहाणे आवश्यक !
  • याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !