दिव्यांग बांधवांच्या समस्यांवर जाब विचारत आमदार बच्चू कडू यांनी अधिकार्याच्या कानशिलात लगावली !
छत्रपती संभाजीनगर येथील घटना !
छत्रपती संभाजीनगर – दिव्यांग बांधवांच्या समस्येवर जाब विचारत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकार्याच्या कानशिलात लगावली. ही घटना ८ ऑगस्ट या दिवशी घडली. समाजकल्याण विभागाने दिव्यांग बांधवांना दिलेल्या ई-रिक्शात एकाच दिवसात बिघाड झाल्याची तक्रार घेऊन काही दिव्यांग बांधव आमदार बच्चू कडू यांच्याकडे गेले होते. त्या वेळी अधिकारी स्पष्टीकरण देत असतांना अचानक बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि संतापून त्यांनी हा प्रकार केला.
९ ऑगस्ट या दिवशी येथे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर एका मोर्चाचे आयोजन केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी बच्चू कडू यांच्या मोर्च्याला अनुमती नाकारल्याचे वृत्त आहे.