रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
१. श्री. नितीन नानासाहेब माने देशमुख, बोंडले (ता. माळशिरस, जि. सोलापूर), महाराष्ट्र.
अ. ‘अप्रतिम ! आश्रमामधील शांतता, स्वच्छता आणि विनम्रता एकदम भावली.
आ. आपली हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची धडपड अन् आत्मीयता पुष्कळ चांगली आहे.
इ. देशातील प्रत्येक गावागावामध्ये असा प्रचार-प्रसार झाला पाहिजे.
ई. आश्रमातील सर्वच गोष्टी खरोखरच स्तुत्य आहेत.’
२. दिगंबर मोहन गोरे, वाघोशी (ता. फलटण, जि. सातारा), महाराष्ट्र.
अ. ‘अप्रतिम ! मी ‘सनातन धर्म’, असे केवळ ऐकून होतो; पण आज हा आश्रम पाहून मला वारकरी संप्रदायाचे भूषण श्री संत तुकोबाराय यांचा अभंग डोळ्यांपुढे उभा राहिला.
धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखांड) खंडण ।।
हेंचि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ।।
तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ।।
नहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ।। – तुकाराम गाथा, अभंग २१२५
अर्थ : सर्व पाखंड मतांचे खंडण करून वेदप्रतिपादित धर्म रक्षण करावा. ‘सर्व धर्मांचे बीज जे भगवंताचे नाम, ते वाढवावे. त्याचा सर्वत्र प्रचार करावा’, हेच आमचे काम आहे. यासाठी कठोर शब्दरूपी बाण हातात घेऊन आम्ही फिरत असतो (कठोर शब्दांनी उपदेश करतो). जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे काम करण्यास आम्हाला लहान अथवा थोर यांची भीड पडत नाही.’
३. श्री. शंकर गणपतराव देशमुख, सोळशी, (ता. कोरेगाव, जि. सातारा), महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून पुष्कळ आनंद वाटला.
आ. संस्थेचे कार्य पाहून अंत:स्फूर्ती मिळाली. यापुढे अखंड कार्य करण्याची मनोकामना व्यक्त करतो. त्यासाठी पुढील काही दिवसांत तुमच्याशी संलग्न होण्याचा निर्धार केला आहे.’
४. श्री. महेश वाघमळे, कण्हेर (जि. सातारा), महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमामध्ये असलेली नियोजनबद्धता मनाला पुष्कळ भावली.
आ. आपण करत असलेले कार्य पुष्कळ वंदनीय आहे.’