सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती !

१. सत्संगापूर्वी आलेली अनुभूती

सौ. अंजली झरकर

१ अ. मन आनंदी होऊन अनुसंधान साधले जाणे : ‘सत्संग आहे’, असे कळल्यापासून माझे मन पुष्कळ आनंदात होते. सकाळपासूनच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधले जात होते.

२. सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समोर दिसताच स्वतःचा विसर पडणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्यक्ष समोर दिसल्यावर मी क्षणभर स्वतःला विसरून गेले. ‘परात्पर गुरुदेवांना डोळे आणि मन भरून पहावे’, ही एकच इच्छा माझ्या मनात होती. ती देवाने पूर्ण केली. त्या वेळी मला कृतज्ञताभावात रहाता आले.

२ आ. श्वासावर लक्ष केंद्रित होऊन श्वास एका लयीत चालू रहाणे : परात्पर गुरुदेव येऊन समोर बसल्यावर माझा ‘महाशून्य’ हा नामजप आपोआप चालू झाला. काही वेळाने नामजप बंद होऊन माझे लक्ष केवळ श्वासावर केंद्रित झाले. माझा श्वास एका लयीत चालू राहून मन पुष्कळ शांत झाले.

२ इ. सुगंध येणे : थोड्या वेळाने ‘कोणता तरी सुगंध येत आहे’, असे मला जाणवले. विचार करूनही ‘सुगंध कोणता आहे ?’, हे कळले नाही. थोड्या वेळाने तो सुगंध जाणवला नाही.

२ ई. मन शांत आणि समाधानी होणे : परात्पर गुरुदेवांना पाहून ‘सर्व काही मिळाले’, असे मला वाटले. ‘माझे मन पूर्णपणे शांत आणि समाधानी झाले आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. अंजली झरकर (वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद,पनवेल.