बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन : महंमद युनूस झाले प्रमुख !
नोबेल पारितोषिक विजेते आहेत युनूस !
ढाका (बांगलादेश) – नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. त्यांना ८ ऑगस्टच्या रात्री राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. त्यांच्यासह अन्य १३ सदस्यांनीही शपथ घेतली. अंतरिम सरकारचे प्रमुख हे पंतप्रधानपदाच्या बरोबरीचे असते.
‘ढाका ट्रिब्युन’च्या वृत्तानुसार शपथविधी सोहळ्याला अनुमाने ४०० लोक उपस्थित होते. भारतालाही त्याचे निमंत्रण होते; परंतु भारताकडून कुणी सहभागी झाल्याची माहिती हाती आलेली नाही.