Human Rights Watch : (म्‍हणे) ‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणामागे राजकीय कारण  !’ – ‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली

‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली यांचा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांवर पांघरूण घालण्‍याचा प्रयत्न

‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार चालूच आहेत; मात्र कथित मानवाधिकारवाले हिंदूंना न्‍याय मिळवून देण्‍याऐवजी हिंदूंच्‍या जखमांवर मीठ चोळण्‍याचे काम करत आहेत. ‘ह्युमन राइट्‍स वॉच’च्‍या आशिया खंडाच्‍या उपसंचालिका मीनाक्षी गांगुली म्‍हणाल्‍या की, बांगलादेशात इस्‍लामवाद्यांकडून होत असलेला हिंसाचार हिंदूंविरुद्धच्‍या द्वेषामुळे नव्‍हे, तर राजकीय कारणांसाठी केला जात आहे.

मीनाक्षी गांगुली यांनी ‘एक्‍स’वर पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, बांगलादेशात जी अल्‍पसंख्‍य हिंदूंवर आक्रमण करण्‍याची श्रृंखला चालू झाली, त्‍यात संगीतकार राहुल आनंद यांचे घरही जाळण्‍यात आले; कारण त्‍यांनी शेख हसीना यांच्‍या अवामी लीग पक्षाला पाठिंबा दिला होता. अधिकार्‍यांनी कायद्याचे राज्‍य सुनिश्‍चित केले पाहिजे. गुन्‍हेगारांना ओळखले पाहिजे आणि त्‍यांच्‍यावर खटला चालवला पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • मीनाक्षी गांगुली या हिंदु असण्‍यासोबत बंगालीही आहेत; मात्र त्‍या बंगाली हिंदूंच्‍याच विरोधात बोलून जिहाद्यांना पाठीशी घालून हिंदुद्रोह करत आहेत ! अशांना कधीतरी हिंदु म्‍हणता येईल का ?
  • जिहादी लोक हिंदूंवर आक्रमण करतांना तो पुरोगामी आहे, नास्‍तिकतावादी आहे कि निधर्मीवादी आहे, हे पहात नाही, तर त्‍यांच्‍यासाठी तो काफिरच असतो. भविष्‍यात गांगुली यांना अशा जिहाद्यांचा सामना करावा लागला, तर हिंदूंनी त्‍यांना का वाचवायचे ?