राहुल गांधी बांगलादेशातील हिंदूंसाठी का बोलत नाहीत ? – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लोकसभेत प्रश्‍न

डावीकडून अनुराग ठाकूर आणि राहुल गांधी

नवी देहली – लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, ‘पंतप्रधान मोदी यांनी एक्‍सवर पोस्‍ट करत बांगलादेशातील अंतरिम सरकारच्‍या प्रमुखांचे अभिनंदन केले आणि ते हिंदूंच्‍या सुरक्षेबद्दलही बोलले. विरोधी पक्षनेत्‍याने (राहुल गांधी यांनी) पोस्‍ट करून प्रमुखांचे अभिनंदन केले, तेव्‍हा त्‍यात हिंदूंच्‍या सुरक्षेविषयी कोणतीही चर्चा किंवा उल्लेख नव्‍हता. ‘हिंदूंचे नाव घ्‍यायचे नाही’, अशी त्‍यांच्‍यावर कोणती सक्‍ती केली आहे का ? ते गाझाबद्दल मोठमोठ्याने बोलतात; मात्र हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत’, अशा शब्‍दांत राहुल गांधी यांच्‍यावर टीका केली. यानंतर लोकसभेत गदारोळ चालू झाला.

संपादकीय भूमिका

राहुल गांधी किंवा एकूण गांधी परिवार आणि काँग्रेसवाले कधीही हिंदूंच्‍या रक्षणासाठी बोलणार नाहीत; कारण त्‍यांनी मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी  स्‍वतःची वैचारिक सुंता करून घेतली आहे !