Mia Khalifa Photo Hoarding : तामिळनाडूत मंदिराच्या कार्यक्रमाच्या फलकावर अश्लील अमेरिकी अभिनेत्रीचे छायाचित्र !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
कांचीपुरम् (तमिळनाडू) – जिल्ह्यातील कुरुविमलाई या गावात नागथम्मन् आणि सेलियाम्मन् मंदिरांत धार्मिक कार्यक्रम चालू आहे. त्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आला आहे. अशातच काही तरुण मुलांनी लावलेल्या एका फलकावर माता पार्वतीच्या बाजूला अमेरिकेची ‘पॉर्नस्टार’ (अश्लील चित्रपटात काम करणारी अभिनेत्री) मिया खलिफा हिचे छायाचित्रही छापले आहे. यामध्ये ती भारतीय वेशभूषेत असून तिने देवीचा कलश डोक्यावर ठेवल्याचे त्यात दिसत आहे. यावरून स्थानिक हिंदूंनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तो फलक काढला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या फलकावर काही तरुणांचीही छायाचित्रे छापण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाकधी कुणा अन्य धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमांत असा प्रकार घडला आहे का ? हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा घटना घडतात, हे जाणा ! |