India Bangladesh Relations : (म्हणे) ‘आमच्या शत्रूला साहाय्य करत असाल, तर परस्पर सहकार्याचा आदर करणे कठीण होईल !’ – बांगलादेश नॅशनल पार्टीचे गयेश्वर रॉय
भारताने शेख हसीना यांना आश्रय दिल्यामुळे बांगलादेश नॅशनल पार्टीचे गयेश्वर रॉय या जन्महिंदु नेत्याची भारताला धमकी !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेश आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचे बांगलादेश नॅशनल पार्टी समर्थन करते; पण जर तुम्ही आमच्या शत्रूला (शेख हसीना यांना) साहाय्य करत असाल, तर या परस्पर सहकार्याचा आदर करणे कठीण होईल, अशी धमकी बांगलादेशातील राजकीय पक्ष ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’चे ज्येष्ठ नेते गयेश्वर रॉय यांनी भारतातील एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ (बी.एन्.पी.) हा माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचा पक्ष आहे. बांगलादेशात नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्ये या पक्षाचा सहभाग आहे.
रॉय यांनी पुढे म्हटले की, भारताने सध्या शेख हसीना यांचे दायित्व घेतले आहे. भारत आणि बांगलादेश यांमधील लोकांचे एकमेकांशी वैर नाही; पण भारताने संपूर्ण देशापेक्षा तेथील एकाच पक्षाला (शेख हसीन यांच्या अवामी लीग पक्षाला) उचलून धरणे योग्य आहे का ?
संपादकीय भूमिका
|