वर्ष २०२४ च्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची वैशिष्ट्ये
१. प्रतिवर्षीपेक्षा या वर्षीचा महोत्सव आध्यात्मिक स्तरावर झाला.
२. सर्वांची मने जुळली होती. सर्व जण कुटुंबभावनेतून कार्य करत होते आणि सहभागी होत होते.
३. ‘सर्व जण साधनेविषयी मार्गदर्शन घेत होते आणि ते अंतर्मुख झाले होते’, असे मला जाणवले.
४. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ उद्घोष गावागावांत पोचणे
गुरुदेवांनी १० वर्षांपूर्वी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ हा उद्घोष केला होता. तो आता गावागावांत पोचत आहे. आता अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या कार्यक्रमाच्या आणि आंदोलनाच्या वेळी ही घोषणा देत आहेत. हा उद्घोष सर्वांचा उत्साह वाढवणारा ठरत आहे. यातून गुरुदेवांचे द्रष्टेपण लक्षात येते.
५. ‘हिंदु राष्ट्र’ या सूत्रांवर संघटनांना एकत्रित करणारी हिंदु जनजागृती समिती !
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील अनेक संघटनांना हिंदु जनजागृती समितीचा आधार वाटतो. या संघटनांचे प्रतिनिधी जाहीर कार्यक्रमात ‘समिती समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करत आहे आणि समितीच्या समवेत कार्य केले पाहिजे’, असे सांगत होते. समिती ही ‘हिंदु राष्ट्र’ या सूत्रावर अनेक संघटनांना एकत्रित करणारी संघटना आहे’, अशी अनेक हिंदु संघटनांमध्ये श्रद्धा निर्माण झाली आहे.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.