मीरा रोड (ठाणे) येथे दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू
मीरा रोड (जिल्हा ठाणे) – ‘ओव्हरटेक’ (वाहनाची गती वाढवून शेजारील वाहनाला मागे टाकणे) करण्याच्या प्रयत्नात मीरा रोडवर महिलेचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका स्कुटीचालक महिलेचा मृत्यू झाला आहे.
पाण्याच्या टँकरला स्कुटीचालक महिला ओव्हरटेक करत असतांना समोरून येणार्या रिक्शेवर धडकली. या अपघातामध्ये स्कुटीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. वैभवी दिलीपभाई देसाई (वय ३९ वर्षे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपघात प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.