पंढरपूर येथील पूरग्रस्तांना मंदिर समितीच्या वतीने खाद्यपदार्थांची पाकीटे ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर येथे पूरग्रस्तांना खाद्यपदार्थांचे पाकीट वाटतांना विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे पदाधिकारी, तसेच अन्य

पंढरपूर – उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंढरपूर शहरातील नदीकाठच्या काही रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. यातील ५०० पूरग्रस्तांना विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने दिवसातून ३ वेळा खाद्यपदार्थांची पाकीटे देण्यात येत आहेत, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

या प्रसंगी मंदिरे समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगांवकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांसह अन्य उपस्थित होते. सदरची पाकीटे मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये सिद्ध करून देण्यात येत आहे.