अनेक शारीरिक त्रास असूनही उत्साहाने आणि तळमळीने सेवा करणार्या फोंडा, गोवा येथील श्रीमती वैशाली कुलकर्णी (वय ७३ वर्षे) !
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आमच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.
श्रीमती वैशाली कुलकर्णी : आश्रमात सेवा अल्प असतांना माझे सेवेप्रतीचे गांभीर्य न्यून होते; मात्र सेवा अधिक असतांना माझ्याकडून पुष्कळ उत्साहाने आणि गांभीर्याने सेवा होते. माझी प्रतिदिन ६ – ७ घंटे सेवा होते. तेव्हा ‘मी पुष्कळ थकले आहे ’, असे मला वाटत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमचे वय किती ?
श्रीमती वैशाली कुलकर्णी : ७३ वर्षे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमचे इतके वय असूनही तुम्ही इतक्या उत्साहाने सेवा कशी करता ?
श्रीमती वैशाली कुलकर्णी : मी काहीच करत नाही. मी केवळ माध्यम आहे. ‘कर्ता करविता ईश्वर आहे’, असा भाव मी ठेवते. मला अनेक शारीरिक त्रास आहेत; पण मी त्याचा विचार करत नाही. मी त्रासाकडे दुर्लक्ष करते आणि सेवा करते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : खूप छान ! यांना खाऊ द्या.’
– श्रीमती वैशाली दिलीप कुलकर्णी (वय ७३ वर्षे), फोंडा, गोवा.