Bangladeshi Girl Letter : बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करण्याची तेथील हिंदु मुलीने पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली मागणी !
ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र देऊन देश सोडल्यानंतरही बांगलादेशामध्ये हिंसाचार चालूच आहे. महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशामधील हिंदु लोकांना लक्ष्य केले जात आहे. लोकांच्या घरात घुसून त्यांच्याकडून पैसे लुटले जात आहेत. घरात घुसून तोडफोड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमाांवर १२ वीत शिकणार्या एका हिंदु मुलीचे पत्र मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. तिने भारताकडे साहाय्य मागितले आहे. ‘स्पुटनिक इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने हे पत्र प्रसारित केले आहे. या पत्रात संबंधित मुलगी भारत सरकारकडे साहाय्याची मागणी करत आहे.
या पत्रात नमूद करण्यात आले आहे की,
१. देशात हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत. विशेषतः हिंदु महिला आणि मुली यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर बलात्कारही करण्यात येत आहेत.
२. हिंदूंची दुकाने सातत्याने लुटली जात आहेत. या सगळ्यात लाखो रुपये लुटले जात आहेत. हिंदूंच्या जिवाच्या आणि घराच्या सुरक्षेसाठी समाजकंटक लाखो रुपयांची मागणी करत आहेत. ‘हिंदूंनी देश सोडला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली जात आहे.
३. मला भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करायची आहे की, त्यांनी आम्हाला लवकरात लवकर साहाय्य करावे. आम्हाला आमच्या देशात शांततेने जगायचे आहे.
४. मला ठाऊक आहे की, भारत सरकारला आमच्याविषयी काळजी आहे आणि कदाचित् तेथील सरकार आम्हाला साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत असेलही; परंतु यामध्ये विलंब केल्यास मोठी हानी होऊ शकते.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेता आतातरी भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करील का ? |