Assam CM On Bangladesh Crisis : १० वर्षांत आसाम, बंगाल आणि झारखंड राज्यांची स्थिती बांगलादेशासारखी होईल !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘येत्या १० ते १५ वर्षांत आसाम, बंगाल आणि झारखंड या राज्यांची स्थितीही बांगलादेशासारखी होऊ शकते’, असे वक्तव्य केले आहे. सरमा यांनी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले की, आसाम, बंगाल आणि झारखंड येथील हिंदु समुदायाला त्यांच्या भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पुढील १०-१५ वर्षांत तेथे अशी परिस्थिती उद्भवू नये, अशी माझी इच्छा आहेे.
ते म्हणाले की…,
१. बांगलादेशातील इस्कॉन मंदिर आणि श्री दुर्गा मंदिर पाडल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. बांगलादेशमध्ये एका हिंदूची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला लटकवल्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. बांगलादेशातील घटना मला पुनःपुन्हा आठवण करून देत आहे की, आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत.
२. वर्ष २००१ ते २०१४ पर्यंत आसाम पोलिसांमध्ये सुमारे ३० ते ३५ टक्के भरती एका विशिष्ट समुदायातील (मुसलमानांची) लोकांची करण्यात आली होती. आज आसाम सरकार पोलीस आणि वनरक्षक दल यांमध्ये प्रत्येक धर्मातील लोकांची भरती करत आहे.