भिवंडी येथे सहस्रो संतप्त हिंदूंकडून प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा !
धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीशी असभ्य संभाषण करून हिंदूंवर आक्रमण केल्याचे प्रकरण
भिवंडी (जिल्हा ठाणे), ८ ऑगस्ट (वार्ता.) – येथील गायत्रीनगर भागात रहाणार्या एका अल्पवयीन मुलीशी ‘वेलकम’ उपाहारगृहाचा मालक रऊफ खान याने असभ्य संभाषण केलेे. यानंतर रऊफ यास खडसावण्यासाठी पीडित मुलीची आई तिथे गेली. त्याने तिला शिवीगाळ करून तिच्यावर आक्रमण केले. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या विकास यादव आणि उमेश पाटील या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरही धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. यात ते दोघे गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून भिवंडी येथील प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहस्रो हिंदू सहभागी झाले होते. त्या वेळी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
१. अलीकडच्या काळात जिहादी मानसिकतेतून हिंदूंवर आघात करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी सरकार आणि प्रशासन यांनी बघ्याची भूमिका न घेता ठोस कृती करावी, अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच संबंधित हिंदु मुलीच्या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
२. या मोर्चात भाजपचे आमदार महेश चौगुले, अधिवक्ता मनोज रायचा, मनसे, रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जागरण मंच आदी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३. हिंदु समाजावरील आक्रमणे वाढत आहेत. मुली आणि महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्या सरकारने कठोर भूमिका घेत जिहाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
४. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्या शासनाने जिहाद्यांवर कठोर कारवाई करावी’, असे पू. चिदानंदजी सरस्वती महाराज या वेळी म्हणाले.
५. महंत शिवरूपानंद महाराज यांनी हिंदु समाजाला त्यांच्या वस्त्यांमध्ये ‘हिंदु शक्ती केंद्रे’ उभी करण्याचे आवाहन केले. (अशी केंद्रे उभारली गेली नाहीत, तर बांगलादेशासारखी स्थिती भारतात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, हे जाणा आणि जागृत व्हा ! – संपादक)