SANATAN PRABHAT EXCLUSIVE : आमच्या रक्षणासाठी प्रयत्न करा, अन्यथा २-३ वर्षांत बांगलादेशातून आमचा नायनाट होईल ! – बांगलादेशी हिंदु
|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंदू नरकयातना भोगत असून हे सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तेथील हिंदूंच्या तोंडून ऐकले. देशातील काही भागांतील हिंदूंशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या दैनावस्थेची माहिती विशद केली. एका हिंदु अभियंत्याशी बोलून झाल्यानंतर त्याने २ तासांनी पुन्हा संपर्क करून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे कळकळीची विनंती करून सांगितले की, आमच्या रक्षणासाठी प्रयत्न करा, अन्यथा २-३ वर्षांत बांगलादेशातून आमचा नायनाट होईल ! तुम्ही पंतप्रधान मोदी आणि अन्य मंत्री यांना सांगा की, आमच्या रक्षणासाठी काहीतरी करा ! भारत सरकारला आमच्या स्थितीची कोणतीही कल्पना नाही !
१. आम्ही गेली ३ रात्र झोपलेलो नाही !
एका गावातील हिंदूशी चर्चा केली असता त्याने सांगितले की, माझ्या गावात हिंदूंची केवळ ५० घरे असून आम्ही जेमतेम २०० हिंदू रहात आहोत. आम्ही गेली ३ रात्र झोपलेलो नाही. मुसलमान आमच्यावर केव्हाही आक्रमण करू शकतात, अशी स्थिती आहे.
२. आम्हाला घर सोडून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे !
एका मोठ्या शहरातील प्रथितयश हिंदूला संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणभाष घेतला नाही. त्यांनी संदेशांद्वारे सनातन प्रभातच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, आम्हाला घर सोडून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मी तुमच्याशी बोलूही शकत नाही. येथील स्थिती अत्यंत भयावह आहे.
काही हिंदूंनी त्यांच्या नावाचा उल्लेख न करण्याच्या विनंतीवरून तेथील भयावह स्थितीचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे पाठवली आहेत.