Bangaladesh Hindu Attack : बांगलादेशात अद्यापही हिंदूंवर आक्रमणे चालूच
‘जमात-ए-इस्लामी’कडून केले जात आहे लक्ष्य !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात अद्यापही हिंदूंवरील आक्रमणे थांबलेली नाहीत. शेकडो हिंदूंच्या घरांवर आक्रमणे चालू आहेत. अनेकांच्या हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यासह काहींचे अपहरणही करण्यात आले आहे. या आक्रमणांविषयी कोणतीही अधिकृत माहिती बांगलादेशाकडून देण्यात आलेली नाही; मात्र सामाजिक माध्यमांवर पीडित हिंदूंनी त्यांच्यावरील आक्रमणाचे व्हिडिओ बनवून प्रसारित केले आहेत. त्यावरून या आक्रमणांचे गांभीर्य लक्षात येत आहे.
जमात-ए-इस्लामी समूह रस्त्यावर बंदूक घेऊन फिरत आहेत !
प्रसारमाध्यमाशी बोलतांना एका बांगलादेशी हिंदु तरुणाने सांगतले की, आम्हाला बांगलादेशातील काही लोक साहाय्य करत आहेत; मात्र काही धर्मांध आक्रमण करत आहेत. ते जीवे मारण्यासही मागे-पुढे पहात नाहीत. जमात-ए-इस्लामी समूह बांगलादेशातील रस्त्यावर बंदूक घेऊन फिरत असून ही हिंदूंसाठी चिंतेची गोष्ट आहे. इंटरनेटची सुविधा बंद केली जात आहे. यामुळे पीडित हिदूंना कुणाशीही संपर्क साधता येत नाही.
जमात-ए-इस्लामीकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची सूची बनवून त्यांवर आक्रमणे !
जमात-ए-इस्लामी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची सूची बनवत आहे. त्यानुसार त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत. ‘विश्व हिंदु महासंघ, बांगलादेश’ या संघटनेनेे अपहरण झालेल्या, तसेच अत्याचार झालेल्या महिलांची सूची प्रसारित केली आहे. यामध्ये ३ हिंदु महिलांचा समावेश आहे. त्या महिलांचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक बांगलादेशी हिंदू त्यांचे खरे नाव सांगत नाहीत. त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळूनही जाता येत नाही.
शेख हसीना यांच्या त्यागपत्रानंतर कारागृहात असणार्या २ सहस्र २०० हून अधिक धर्मांधांना जामीन संमत करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदूंची अवस्था आणखी बिकट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाजगात हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ही स्थिती त्यांचा निर्वंश होईपर्यंत चालूच रहाणार आहे, हे स्वीकारावे लागेल ! |