आमची लोकसंख्या २५ कोटी असून त्यातील ५ कोटी बलीदान देऊन राज्यघटना उलथवतील ! – मुसलमान नेता
मुसलमान नेत्याचा देशद्रोही विधान असणारा व्हिडिओ होत आहे प्रसारित
नवी देहली – उघड्या कानांनी ऐका, तुमच्या कानात घाण असेल, तर ती बाहेर काढून ऐका. आता आपण ५ लाख नव्हे, तर २५ कोटी लोकसंख्येची जनता आहोत, त्यांपैकी ५ कोटी लोक बलीदान देतील आणि तेवढीच संख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना उलथवून नवा इतिहास लिहितील, असे चिथावणीखोर आणि देशद्रोही विधान करणार्या मुसलमान नेत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या नेत्याचे नाव समजू शकलेले नाही. या विधानावर समाजातील विविध स्तराहून जोरदार टीका होत आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी ‘हे अस्वीकार्य आणि घटनात्मक मूल्यांच्या विरोधात आहे’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका‘भाजप सरकार राज्यघटना पालटत आहे’ अशी ओरड करणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी पक्ष आता कुठे आहेत ? ते याविषयीर तोंड का उघडत नाहीत ? |