केशकर्तनालयाचा मालक युसूफ याने थुंकी लावून केला ग्राहकाच्या चेहर्याचा मसाज
कनौज (उत्तरप्रदेश) येथे थुंकी जिहाद !
कन्नौज (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील तलग्राम पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्या एका केशकर्तनालयामध्ये एका ग्राहकाच्या चेहराचा मसाज करतांना थुंकीचा वापर केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी मसाज करणारा युसूफ याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तो या केशकर्तनालयाचा मालक असून ग्राहकाचे डोळे बंद असतांना युसूफ याने थुंकीचा वापर केला. हा व्हिडिओ १० दिवसांपूर्वीचा असल्याचे म्हटले जात आहे.
कन्नौजमधील भाजपचे माजी खासदार सुब्रत पाठक यांनी या घटनेवर ‘एक्स’वर पोस्ट करत याला ‘थुंक जिहाद’ म्हटले आहे. सुब्रत पाठक यांनी लिहिले आहे की, पोलीस त्यांचे काम करतील; पण आपण काळजी घेतली पाहिजे.
संपादकीय भूमिकाअशा घटनांविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी पक्ष काही बोलत नाहीत ! |