पुणे येथे ११ मंदिरांमध्ये चोर्या करणार्या चोराला अटक !
पुणे – येथील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड भागांतील ११ मंदिरांमध्ये विनायक जिते या सराईत चोराने चोरी केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे उघडकीस आले आहे. त्यानंतर शिक्रापूर परिसरात त्याला सापळा रचून ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६३ सहस्र रुपयांचे दागिने, १ लाख १७ सहस्र रुपयांचे चांदीचे मुखवटे, ८० सहस्र रुपयांचे पूजा साहित्य जप्त करण्यात आले.
सराईत चोर शिक्रापूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून चोराला पकडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे या वेळी उपस्थित होते.
हरिपूर (सांगली) येथे घरफोडी करून चोरट्यांनी ४० तोळे दागिने पळवले !सांगली, ८ ऑगस्ट (वार्ता.) – सांगली शहरालगत असलेल्या हरिपूर (तालुका मिरज) येथील २ बंगले ५ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडून एकूण ४० तोळे सोन्यासह २ लाख रुपयांची रोकड पळवली. अनुमाने ३० लाख रुपयांचा माल चोरट्यांनी पळवला. या परिसरातील २ मंदिरांतही चोरीचा प्रयत्न झाला. हरिपूर परिसरातील विस्तारित भागात महिन्याभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. (चोरटे धुमाकुळ घालेपर्यंत पोलीस काय करत आहेत ? चोरट्यांना पोलिसांचा धाक नसल्याचे द्योतक ! – संपादक) ३ चोरटे ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाले असून ग्रामीण पोलीस त्याविषयी अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी प्रशांत अडसूळ यांनी तक्रार दिली आहे. अडसूळ यांच्या बंगल्यातून चोरी झाली असून बंगल्यातील भाडेकरूंना चोरट्यांनी डांबून ठेवले होते. दुसरा बंगला फोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी पळवून नेली आहे. चोरट्यांनी गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिरातही चोरीचा प्रयत्न केला होता. |
संपादकीय भूमिका :हिंदूंच्या मंदिरांमध्ये चोर्या होणारच नाहीत, याची दक्षता पोलिसांनी घेणे अपेक्षित ! |