१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

साधकांसाठी सूचना

१. सार्वजनिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन शाळा, महाविद्यालये, तसेच गर्दी असणारे चौक आदी ठिकाणी लावता येईल. या वेळी प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, याकडे लक्ष द्यावे. प्रामुख्याने राष्ट्ररक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनस्थळी ठेवावेत. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसल्यास त्या ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची ठेवावी. तेथे ग्रंथांची माहिती देणारे फलकही लावता येतील.

१ अ. राष्ट्ररक्षणाविषयी उपलब्ध असलेले ग्रंथ

१ अ १. मराठी भाषेतील ग्रंथ

अ. राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

आ. लव्ह जिहाद

इ. हलाल जिहाद

ई. इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना

उ. राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय

ऊ. धर्मशिक्षण फलक

१ अ २.  हिंदी भाषेतील ग्रंथ

अ. धर्मका आचरण एवं रक्षण

आ. लव जिहाद

इ. धर्म-परिवर्तन एवं धर्मांतरितों का शुद्धीकरण

ई. हिन्दू राष्ट्रकी स्थापनाकी दिशा

उ. लोकतन्त्रमें फैली दुष्प्रवृत्तियोंके विरुद्ध प्रत्यक्ष कार्य

ऊ. धर्मशिक्षा फलक

ए. हिन्दू धर्मपर हो रहे आक्रमणोंपर उपाय

२. प्रवचनांचे आयोजन

मंदिरे, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, निवासी संकुले आदी ठिकाणी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयीच्या, तसेच क्रांतीकारकांचे माहात्म्य सांगणार्‍या प्रवचनांचे आयोजन करता येईल.

३. राष्ट्ररक्षणाच्या संदर्भातील माहिती सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लिहून फलकप्रसिद्धी करता येईल.

१५ ऑगस्टच्या या सेवांमध्ये जिल्ह्यातील राष्ट्र आणि धर्म प्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी उत्तरदायी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

अ. १५ ऑगस्टला शाळांमध्ये राष्ट्ररक्षणाच्या संदर्भातील प्रवचनांचेही आयोजन करावे.

आ. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बर्‍यांच शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये विद्यार्थी भाषण करतात. अशा विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालये यांच्या वतीने पारितोषिके देण्यात येतात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे बीज रोवले जावे, यासाठी विद्यार्थ्यांना वरील ग्रंथ भेटस्वरूपात देता येतील, असे आपण मुख्याध्यापकांना सुचवावे.’

(४.८.२०२४)