कल्याण येथे रेल्वेस्थानकामध्ये महिला प्रवाशावर महिला तिकीट कर्मचार्याकडून आक्रमण !
सुट्या पैशांवरून वाद
ठाणे, ७ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ७ वरील स्कायवॉकवर असलेल्या रेल्वेच्या तिकीट खिडकीजवळ ५ ऑगस्टला एक महिला रेल्वे प्रवासी तिकीट काढत होती. रेल्वे तिकीट कर्मचारी महिला सुट्टे पैसे दिल्याविना तिकीट मिळणार नाही; म्हणून अडून बसली होती. सुटे पैसे जवळ नसल्याने तिकीट द्यावे, अशी विनंती प्रवासी महिला करत होती; पण रेल्वे महिला कर्मचार्याने महिला प्रवाशाशी वाद घातला. महिला प्रवासी झालेल्या घटनेचे चित्रीकरण करत असल्याचे पाहून तिला राग आला. यानंतर महिला तिकीट कर्मचार्याने तिच्यावर आक्रमण केले. अन्य प्रवासी मध्ये पडल्याने हा वाद काही वेळाने मिटला.
रेल्वे तिकीट खिडकीवरील बहुतांशी महिला तिकीट कर्मचारी या तिकीट काढतांना सुटे पैसे नसतील, तर प्रवाशांची अडवणूक करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठांनी नोंद घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे महिला कर्मचार्यावर कारवाईची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|