(म्हणे) ‘जर मुसलमानांनी एकत्र येऊन पूर्ण शक्ती वापरली, तरी त्यांना रोखता येणार नाही !’
बरेलीच्या हसीब अन्सारीची भडकाऊ व्हॉट्सअॅप पोस्ट !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील नवाबगंज भागातील रहिवासी हसीब अन्सारी याने नुकतेच भडकाऊ व्हॉट्सअॅप पोस्ट प्रसारित करून वातावरण बिघडवल्याची घटना समोर आली आहे. त्यात हसीबने लिहिले की, जर मुसलमान एकत्र आले, तर त्यांना पूर्ण शक्ती वापरूनही रोखता येणार नाही ! येथील हिंदु संघटनांनी हसीब अन्सारीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि अन्वेषण चालू केले आहे.
हसीबच्या संतापजनक व्हॉट्सअॅप पोस्टच्या पार्श्वभूमीवर बरेलीचे विहिंप कार्यकर्ते हिमांशू पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना हसीबवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाएखाद्या हिंदु नेत्याने अशा प्रकारे मुसलमानांच्या विरोधात वक्तव्य केले असते, तर एव्हाना पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी जमातीने एकजात हल्लकल्लोळ माजवला असता ! |