मुरगुड (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील उपनगराध्‍यक्षांच्‍या दालनात नमाजपठण : आज मुरगुड बंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुरगुड (जिल्‍हा कोल्‍हापूर) – येथील उपनगराध्‍यक्षांच्‍या दालनात ६ ऑगस्‍टला सायंकाळी आठवडा बाजारासाठी आलेल्‍या २ मुसलमान व्‍यापार्‍यांनी नमाजपठण केले. ही गोष्‍ट समजल्‍यावर संतप्‍त तरुणांनी नगरपालिकेत जाऊन या दोघांना पोलिसांच्‍या कह्यात दिले. यानंतर संबंधितांवर कारवाई होण्‍यासाठी ठिय्‍या आंदोलन केले आणि घोषणा दिल्‍या. या प्रकरणी हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या वतीने संबंधितांवर कारवाई होण्‍यासाठी ८ ऑगस्‍टला ‘मुरुगुड बंद’चे आवाहन करण्‍यात आले आहे.

संबंधित २ मुसलमान कसे काय पालिकेत पोचले ? त्‍यांना दालनात येण्‍यापासून शिपाई आणि अधिकारी यांनी का रोखले नाही ? असा प्रकार होण्‍यास उत्तरदायींवरही कधी कारवाई होणार ? असे संतप्‍त प्रश्‍न उपस्‍थित हिंदूंनी उपस्‍थित केले. यामागे कोण आहे ? याला उत्तरदायी असलेल्‍या अधिकार्‍यांनी त्‍यागपत्र द्यावे, अशाही मागण्‍या याप्रसंगी करण्‍यात आल्‍या.

शासकीय जागेत नमाजपठण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंदवण्‍याची मागणी

मुरुगुड नगरपालिकेत उपनगराध्‍यक्षांच्‍या दालनात अवैधरितीने नमाजपठण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद करावा, या मागणीची तक्रार कबनूर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. दत्तात्रय शिंदे यांनी ई-मेलद्वारे मुरगुड पोलीस ठाणे, तसेच कोल्‍हापूर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

कोल्‍हापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याच्‍या परिसरात नमाजपठण केल्‍याचा प्रकार !

असाच प्रकार २९ एप्रिल या दिवशी कोल्‍हापूरमधील रुईकर कॉलनी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याजवळ घडला होता. तेथे एका मुसलमान व्‍यक्‍तीने नमाजपठण केले होते. त्‍या वेळी परिसरातील शिवप्रेमींनी शाहूपुरी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली होती.

मुरगुड येथील शासकीय इमारतीत निष्‍काळजीपणे वागणूक केलेल्‍या संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे निलंबन करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांचे मुख्‍याधिकार्‍यांना निवेदन

मुरगुड नगरपालिकेत मुख्‍याधिकारी संदीप घार्गे यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

 ६ ऑगस्‍टला मुरगुड येथील प्रशासकीय इमारतीमध्‍ये काही समाजकंटकांनी प्रशासकीय वेळेखेरीज उपनगराध्‍यक्ष यांच्‍या दालनात नमाजपठण केले. त्‍यांना असे दालन उपलब्‍ध करून देणारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कायमस्‍वरूपी निलंबनाची कारवाई करण्‍यात यावी, तसेच संबंधित कर्मचारी यांना दालन कुणी उघडून देण्‍यास सांगितले, याचेही अन्‍वेषण व्‍हावे, या मागणीचे निवेदन हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या वतीने मुरगुड मुख्‍याधिकारी संदीप घार्गे यांना देण्‍यात आले. या संदर्भात योग्‍य ते अन्‍वेषण करून योग्‍य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्‍याधिकार्‍यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठांना दिले.

या प्रसंगी सर्वश्री नामदेवराव मेंडके, दगडू शेणवी, विजय गोंधळे, श्रीकांत शिंदे, सुबोध कलघुटगी, गुरुदेव सूर्यवंशी यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

सध्‍या भारतात बर्‍याच ठिकाणी धर्मांधांकडून सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी जागेत नमाजपठण करण्‍याचे प्रकार वाढले आहेत. हे एक सुनियोजित षड्‍यंत्र असल्‍यामुळे याची सरकारी यंत्रणांना नोंद घेऊन कार्यवाही करणे आवश्‍यक आहे !