मुसलमान तरुणीशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुबियांनी हिंदु तरुणाची केली निर्घृण हत्या !
द्वारका (गुजरात) – जिल्ह्यातील मुसलमान तरुणीशी लग्न केल्याच्या कारणावरून एका हिंदु तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याज्ञिक लक्षीदास दुधरेजिया असे मृतकाचे नाव आहे. याज्ञिकने त्याच्याच गावातील रझमा या मुसलमान तरुणीसमवेत दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. रझमाच्या कुटुंबियांना हे नाते मान्य नव्हते. सुरक्षिततेच्या भीतीने पत्नीसह गाव सोडून गेलेल्या याज्ञिकला फसवून बोलावण्यात आले. ३ ऑगस्ट या दिवशी कुर्हाडीने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात रजमाचा भाऊ साजिद, तिचा मामा सलीम, अमेद मुसा, जुमा, उस्मान आणि कासम यांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहिती अशी…!
१. द्वारका जिल्ह्यातील भानवड तालुक्यात ही घटना घडली. येथील शेडखाई गावात रहाणार्या याज्ञिकने दीड वर्षापूर्वी शेजारी रहाणार्या रझमा नावाच्या मुसलमान तरुणीशी लग्न केले.
२. त्यानंतर याज्ञिकला जिवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने त्याने पत्नीसह गाव सोडले. दीड महिन्यापूर्वी रझमाने एका मुलीला जन्म दिला.
३. अलीकडच्या काळात रझमाच्या कुटुंबियांनी याज्ञिकसमवेत चांगल्या वर्तनाचे नाटक चालू केले. रझमाच्या कुटुंबियांचा डाव ओळखता न आल्याने याज्ञिक पत्नी आणि मुलीसह गावी परतला.
४. अशातच रझमाचे कुटुंबीय याज्ञिकला मारण्यासाठी योग्य वेळ शोधत होते. ३ ऑगस्टच्या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास याज्ञिक त्याच्या मित्रासह गावाच्या बसस्थानकावर गेला. त्या वेळी रझमाच्या कुटुंबियांनी त्याचा पाठलाग केला. त्या सर्वांच्या हातात कुर्हाड, चाकू आणि लोखंडी सळ्या होत्या. त्यांनी याज्ञिकला चारही बाजूंनी घेरले आणि अंदाधुंद मारहाण केली. याज्ञिकला काही समजण्यापूर्वीच त्याच्या पोटात चाकूचे अनेक वार करण्यात आले आणि डोक्यात लोखंडी सळ्यांनी वार करण्यात आले.
५. याज्ञिकच्या मित्राने त्याच्या कुटुंबियांना भ्रमणभाषवरून सर्व माहिती दिली. लगेच त्याची आई आणि पत्नी घटनास्थळी पोचले. तोपर्यंत आक्रमणकर्ते पळून गेले होते. याज्ञिकला रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला.
६. या प्रकरणी याज्ञिकच्या आईने भानवड पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद करून हत्यार्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आणि साम्यवादी अशा वेळी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |