यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या ! – पेठवडगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी
कोल्हापूर – कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वयक समितीच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी पेठवडगाव येथे हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख श्री. सुनील माने, भाजप युवामोर्चा अध्यक्ष श्री. विकास कांबळे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष श्री. आप्पासाहेब माने, भाजपा उपजिल्हाध्यक्ष श्री. मनोहर काटकर, भाजप शहराध्यक्ष श्री. जगन्नाथ माने, जैन पदवीधर संघटना धर्मरक्षा अध्यक्षा सौ. सुप्रिया पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर पेठवडगाव येथील मुख्याधिकारी सुमित जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. लक्ष्मण सरगर यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री राजेंद्र बुरुड, धनंजय गोंधकर, विशाल सणगर, युवराज वाळवेकर, सुहास झगडे, जगदीश माहादार ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. राजेंद्र जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विजय गुरव, शिवसेनेचे श्री. अक्षय मदने, भाजप युवा मोर्चाचे श्री. अमर पाटील, भाजपचे श्री. प्रज्योत शहा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तालुकाध्यक्ष श्री. ऋषिकेश चांदगिरी, भाजप तालुकाध्यक्ष श्री. अमरसिंह पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री. अंकुश माने, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा सूर्यवंशी उपस्थित होत्या.