MP Geert Wilders : बांगलादेशातील हिंदूंवरील इस्लामी आक्रमणे थांबवा ! – खासदार गीर्ट विल्डर्स
नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचे आवाहन
अॅम्स्टरडॅम्स (नेदरलँड्स) – बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार भयानक आहेत. त्यांना मारले जात आहे आणि इस्लामी जमाव त्यांची घरे जाळत आहेत. हे तात्काळ थांबले पाहिजे, असे आवाहन नेदरलँड्सच्या पार्टी फॉर फ्रीडम पक्षाचे प्रमुख असणारे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे. (युरोपीय देशातील एक खासदार बांगलादेशातील हिंदूंविषयी सहानुभूती दाखवतो. या उलट भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी बांगलादेशातील सोडाच, भारतातील पीडित हिंदूंविषयी अशी सहानुभूती दाखवतात ? – संपादक)