‘रिल्स’ बनवतांना तरुण-तरुणी १०० फूट खोल खाणीत पडले !
‘अती तेथे माती !’ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायकच !
अमरावती – येथील गिट्टी खदानमध्ये ‘रिल्स’ (काही सेकंदाचा व्हिडिओ) करतांना तरुणीचा तोल गेल्याने ती १०० फूट खोल खाणीत कोसळली, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणही खाली कोसळला. यात ते दोघेही गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ते दोघांचेही वय १७-१८ वर्षे आहे. बचाव पथकाच्या कर्मचार्यांनी दोघांना खाणीतून बाहेर काढले.