महिलांचे सर्व अश्लील व्हिडिओ खरे ! – न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
|
बेंगळुरू (कर्नाटक) – जवळपास ३ सहस्र महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यावरून अटकेत असलेले हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. सामाजिक माध्यमांतून या संबंधांचे सहस्रो व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले होते. हे सर्व व्हिडिओ खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात त्यांच्याशी कोणतीही छेडछाड (‘एडिट’ अथर्वा ‘मॉर्फ’) केलेली नाही, असा निष्कर्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाला अधिक बळ मिळाले आहे.
या सर्व व्हिडिओजमध्ये पुरुषाचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे अश्लील व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवण्णा आहेत का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या व्हिडिओ केवळ खरे असल्याचे अहवालातून कळते. पुढील काही दिवसांत या व्हिडिओजमध्ये दाखवण्यात आलेेले पुरुष हे प्रज्वल रेवण्णा आहेत का, हेही स्पष्ट होईल. या अहवालानंतर पथकाच्या अधिकार्यांचा तपास तीव्र झाला आहे आणि लवकरच न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले जाईल, असे सूत्रांकडून समजते.