मुसलमानवाडी (कोल्हापूर) येथील बाधितांना दीड कोटी रुपयांची वाढीव भरपाई !

राज्यशासनाकडून आदेश

कोल्हापूर – विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेच्या कालावधीत उद्रेक झाल्यानंतर गजापूर येथील मुसलमानवाडी येथील बाधितांना १ कोटी ४९ लाख ९० सहस्र रुपयांची वाढीव भरपाई देण्याचा आदेश राज्यशासनाने काढला आहे. या प्रकरणी सरकारकडून गत महिन्यात या अगोदर तातडीचे साहाय्य म्हणून ५६ बाधित कुटुंबांना सानुग्रह अनुदान म्हणून २५ सहस्र रुपये आणि बाधित ४२ घरांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २५ सहस्र रुपये देण्यात आले आहेत. (आजपर्यंत सरकारकडून पूर, भूकंप अथवा अन्य कुठलीही नैसर्गिक आपत्ती, तसेच दंगल प्रकरणात इतक्या तातडीने हिंदूंना कधी साहाय्य झाल्याचे ऐकीवात नाही ! हिंदूबहुल देशात निधर्मी राज्यव्यवस्थेत आणखी किती काळ केवळ ‘अल्पसंख्यांकां’चे लाड होणार आहेत ? हिंदूंना त्यांचे न्याय्य अधिकार कधी मिळणार ? – संपादक)