सूक्ष्मातील प्रयोग करतांना डोळ्यांपेक्षा तळहातांनी स्पंदने अनुभवा !
‘सूक्ष्मातील प्रयोग करतांना एखाद्या वस्तूकडे बघून डोळ्यांनी तिच्यातील स्पंदने अनुभवता येतात. या पद्धतीपेक्षा त्या वस्तूकडे तळहात करून तिच्याकडून येणारी स्पंदने तळहातावर अधिक जास्त प्रमाणात अनुभवता येतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.