विशाळगड अतिक्रमण उद्रेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २४ पैकी १७ हिंदूंना जामीन संमत !
कोल्हापूर – विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या संदर्भात १४ जुलै या दिवशी आंदोलन झाल्यावर गजापूर येथे मुसलमानवाडी येथे काही घरांची तोडफोड झाली होती.
या प्रकरणी पोलिसांनी २४ हिंदूंना अटक केली होती. यातील १७ हिंदूंना जिल्हा न्यायालयाने ६ ऑगस्टला जामीन संमत केला. उर्वरित ७ हिंदूंचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तक्रारदाराच्या अधिवक्त्यांनी ७ जणांविषयी प्रत्यक्ष दर्शनी छायाचित्रे ‘व्हिडिओ स्टेटस’च्या माध्यमातून लावल्याचे न्यायालयात सांगितले. ज्या हिंदूंचा जामीन फेटाळण्यात आला, त्या सर्वांच्या संदर्भात तात्काळ उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगण्यात आले.