हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने केले निर्दाेष मुक्त !
मंगळुरू (कर्नाटक) येथे १२ वर्षांपूर्वी एका पार्टीवर केलेल्या आक्रमणाचे प्रकरण
मंगळुरू (कर्नाटक) – येथे २८ जुलै २०१२ या दिवशी हिंदु जागरण वेदिके या संघटनेवर ‘होम स्टे’ (मेजवानी करण्याचे ठिकाण) पार्टीवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आरोप करण्यात आला होता. त्याच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्या सर्वांना या प्रकरणातून निर्दाेष मुक्त करण्याचा निर्णय जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. येथे वाढदिवसानिमित्त मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी झालेले अमली पदार्थांचे सेवन करत होते आणि तेथे वेश्याव्यवसायही चालत होता, या आरोपातून तेथे आक्रमण झाले होते. या वेळी मेजवानीत सहभागी झालेल्यांना मारहाण करण्यात आली होती. मेजवानीमध्ये सहभागी असणार्या तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या मेजवानीमध्ये पोलीस खात्यातील २ उच्चाधिकार्यांच्या मुलींचाही समावेश होता.
पोलिसांनी एकूण ४४ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट केले होते. या घटनेच्या १२ वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर ६ ऑगस्टला अंतिम निकाल आला आणि सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.
संपादकीय भूमिका१२ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच होय ! |