पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची ‘अभंगवाणी’ !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज हे वाळवे बद्रुक (जिल्हा कोल्हापूर) येथील आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तसेच पंढरपूर येथील नामदेव टेंभूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांप्रदायिक अनुयायी बनले. त्यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अवीट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
कलियुगा माझी विनंती । जिवांना लाभो सद्गती ।। १ ।।
जगी नांदावा बंधुभाव । जिवातील जाणावा देव ।। २ ।।
माझा नमस्कार स्वीकारावा । सर्वांना आशीर्वाद द्यावा ।। ३ ।।
भोगातून योग साधावा । कल्याण मार्ग जाणावा ।। ४ ।।
कलीत उद्धरणं सोपं । भावे करा ईश्वर जप ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे
(साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)