‘निर्विचार’ हा नामजप सहजतेने म्हणणारी सांगली येथील दैवी बालिका कु. देविका सावंत (वय ५ वर्षे) !
‘१४.५.२०२१ या दिवशी मी आमच्या विश्रामबाग, सांगली येथील सदनिकेच्या समोरच्या सदनिकेत रहाणारी कु. देविका सावंत (त्या वेळी तिचे वय ३ वर्षे होते.) (वर्ष २०२१ मधील आध्यात्मिक पातळी ५६ टक्के) हिला भ्रमणभाषवरून ‘निर्विचार’ हा नामजप ५ – ६ वेळा म्हणून दाखवला.त्या वेळी ती खेळत होती. त्यामुळे ‘तिने या नामजपाकडे फारसे लक्ष दिले नाही’, असे मला वाटले.
त्यानंतर आमच्या घरातील व्यक्तींनीही दुपारच्या वेळी तिला हा नामजप मोठ्याने म्हणून दाखवला. सायंकाळी देविका बाहेर जातांना संपूर्ण वेळ तिने मोठ्याने ‘निर्विचार’ हा नामजप केला. १५.५.२०२१ या दिवशी रात्री मी तिच्याशी भ्रमणभाषवर बोलत असतांना तिने मला ‘निर्विचार’ हा नामजप म्हणून दाखवला. ती तो नामजप इतक्या सहजतेने म्हणत होती की, ‘मला वाटले, ‘जणू ती हा नामजप पुष्कळ कालावधीपासून करत आहे.’ तिने मोठ्याने म्हटलेला नामजप ऐकतांना मला चांगले वाटत होते.
तेव्हा ‘दैवी बालके कशी असतात आणि परात्पर गुरु डॉक्टर दैवी बालकांकडूनही कसा नामजप करून घेत आहेत ?’, हे लक्षात येऊन मला त्या दोघांप्रती कृतज्ञता वाटली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘दैवी बालकेच हिंदु राष्ट्र चालवतील’, या उद्गारांची सत्यता या प्रसंगातून अधोरेखित झाली.’
– सुश्री राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा