हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत !
हिंदूंवर होणारे मिथ्या आरोप आणि त्यांच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे !
काँग्रेसच्या हाती देशाची सत्ता होती, त्या दिवसापासून काँग्रेसने राज्यघटनेमध्ये आमूलाग्र पालट केले. एवढेच नाही, तर ‘राज्यघटनेची निर्मिती करतांनासुद्धा मुसलमानांना सर्व प्रकारच्या सवलती मिळतील’, याचे पूर्ण प्रावधान (तरतूद) राज्यघटनेच्या काही कलमांमध्ये करून ठेवले. निर्बंधासमोर सर्व समान अशी घोषणा केली. कागदोपत्री तशी नोंदही केली. तथापि प्रत्यक्षात मात्र हे निर्बंध अल्पसंख्यांक समाजाची पाठराखण करणारे आहेत, याचा प्रत्यय वारंवार येत गेला.
काँग्रेस गेली १० वर्षे सत्तेबाहेर आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्तेवाचून जीवन जगता येत नाही; म्हणून ‘देशातील राज्यघटना धोक्यात आहे’, अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या. मुसलमानांना झुकते माप देण्यात आज विरोधी पक्ष आघाडीवर आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत हिंदूंवर अत्याचार करायचे आहेत, हे आता उघड झाले आहे.
१. सध्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणे दुरापास्त होत असल्याची भावना
देशामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ अशा ३ संस्थांची निर्मिती करण्यात आली. देशातील लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदा या संस्थांना ‘कार्यकारीमंडळ’ संबोधण्यात येते. त्यांनाच कायदे करण्याचा अधिकार आहे. त्यांनी केलेले कायदे प्रत्यक्ष कृतीत आणणे आणि देशात शांतता सुव्यवस्था निर्माण करून कोणत्याही प्रकारचा अपराध घडणार नाही अन् अपराध घडत असेल, तर कायद्यांचा आधार घेऊन त्या अपराधांना आळा घालण्याचे, तसेच अपराधांची संख्या न्यून करण्याचे दायित्व हे कार्यकारीमंडळावर, म्हणजेच पोलीसदलावर आहे.
अपराध केलेल्या लोकांना शिक्षा देण्यासाठी न्यायमंडळ अस्तित्वात आले, म्हणजेच न्यायसंस्था, न्यायालये अस्तित्वात आली. न्यायालयाने याच निर्बंधांच्या आधारे अपराध्याला शिक्षा करायची असते. या सर्व तिन्ही यंत्रणांचा विचार करता यात कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ या ३ संस्थांमध्ये परस्पर समन्वय असणे नितांत आवश्यक आहे; कारण या ३ संस्थांमध्ये असलेला समन्वय देशामध्ये शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करून; अन्याय, अपराध करणार्याला शिक्षा करून ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याला लवकरात लवकर न्याय देण्याचे काम न्यायमंडळ नि:पक्षपातीपणे करू शकेल, अशी आशा सर्वसामान्य जनतेला वाटते.
या ३ संस्थांपैकी कुठेही प्रामाणिकपणाचा अभाव असेल, तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणे दुरापास्त होते. सध्या आपल्या देशात अशाच प्रकारची परिस्थिती आहे, याचा अनुभव वारंवार येत आहे.
२. ‘धर्मांधांच्या अयोग्य कृतींवर हिंदूंनी न्याय मागू नये’, अशी स्थिती न्यायमंडळ आणि कार्यकारीमंडळ यांची झाली आहे का ?
मुसलमान समाजातील अनेक मंडळी स्वतःचे नाव पालटतात आणि समाजात वावरतात. हे नाव पालटतांना ते जाणीवपूर्वक हिंदू नावे धारण करतात. याचाच अर्थ हिंदूंची दिशाभूल करणे, हिंदु समाजाची फसवणूक करणे, यातून नाव पालटण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू स्पष्ट होतो. वास्तविक ‘समाजामध्ये नाव पालटून वावरणे आणि स्वतःचे खरे नाव लपवून वेगळेच नाव धारण करून इतरांची फसवणूक करणे’, हा अपराध आहे. असा अपराध मुसलमान समाजातील असंख्य लोक सध्या करत असल्याचे आता उघड झाले आहे.
दुकान, ढाबा, उपाहारगृह यांची नावे हे हिंदु देवीदेवतांच्या नावाने दिलेली असतात; पण या संबंधितांचा मालक मात्र मुसलमान असतो. या मुसलमानांचा धर्म मूर्तीपूजा करायला सांगत नाही; पण मुसलमान हिंदूंची फसवणूक करण्यासाठी त्यांच्या धर्माची आज्ञा पाळतांना दिसत नाहीत. अशा प्रकारे तेच जेव्हा त्यांच्या धर्माच्या आज्ञा पाळत नाहीत, त्या वेळेला त्यांच्या धर्माची हानी होत नाही. त्यांच्या धर्मामध्ये दिलेल्या आज्ञांविषयी जर एखाद्या हिंदूने सत्य कथन केले, तर मात्र ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) हा त्यांचा शरीयत कायदा लगेच अस्तित्वात येतो. तशी कृती करतांना मुसलमान कचरत नाहीत. त्याने केलेली हत्या ही त्यांच्या धर्माच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलेले वर्तन म्हणून त्यांची पाठराखण केली जाते, म्हणजेच ‘हिंदूंवर अन्याय झाला, तर हिंदूंनी न्याय मागू नये, मुसलमानांना जसे वाटते तसे तुम्ही वागले पाहिजे. त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा शब्द उच्चारण्याचे धाडस कराल, तर ते चालणार नाही’, असाच संदेश न्यायमंडळ आणि कार्यकारीमंडळ यांच्या वतीने त्यांच्या कृतीतून हिंदु समाजाला दिला जात आहे, असे आता हिंदूंना वाटू लागले आहे.
३. धर्मांधांच्या जिहादी कृती या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या !
हिंदूंच्या मंदिरांच्या बाहेर बसून मुसलमान स्वतःचे नाव पालटून हिंदु नाव धारण करून फळे, नारळ, मिठाई यांची विक्री करतात. मूर्तीभंजक मूर्तीपूजकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करतो, यामागचा हेतू निश्चितच स्वच्छ नाही. हे सर्व करतांना तो स्वतःचे नाव पालटतो, यामध्येच त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण होते. समाजात वावरतांना सर्वांनाच स्वतःची ओळख व्यक्त करावी लागते, ती लपवता येत नाही. मुसलमान लोक हिंदू नाव धारण करून ज्या वेळी विक्री करतात, त्या वेळी ते विक्री करत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यांच्या धर्मानुसार ते त्या खाद्यपदार्थांवर थुंकतात. त्यांची ही कृती हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. त्यासह अशा प्रकारे थुंकून ते संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य बिघडवतात.
मोकळ्या जागी वा सार्वजनिक ठिकाणी कुठेही ‘थुंकू नये’, असे फलक लावलेले असतात. याचा अर्थ थुंकणे हे सभ्यतेचे लक्षण नाही. ती असभ्यता मानली आहे. अन्नामध्ये थुंकणे यात सभ्यता कोणती ? ‘दुसर्या व्यक्तीच्या थुंकीतून सर्वत्र रोगराई पसरते’, असे आरोग्यशास्त्र सांगते. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांमध्ये थुंकलेले खाद्यपदार्थ विक्रीला ठेवून समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्याचा हेतू मनात ठेवून केलेले वर्तन दंडनीय आहे; कारण यात दुसर्याचा जीव घेण्याचा प्रयत्न दडलेला आहे.
४. धर्मांधांच्या अयोग्य कृतीवर त्यांना शिक्षा न होणे, हे न्यायमंडळाविषयी हिंदूंच्या मनात शंका निर्माण करण्यासारखे !
असे अयोग्य प्रकार करणार्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना शिक्षा करण्याऐवजी जेव्हा न्यायमंडळ हे त्यांना त्यांचे नाव व्यक्त करायला सांगितल्यावर त्यावर तात्पुरती स्थगिती आणते आणि या अपराध्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. न्यायमंडळाचा हा निकाल किंवा तिने दिलेली ही स्थगिती, म्हणजे ‘हिंदू केवळ अन्यायाचेच मानकरी आहेत’, असे सांगणारी आहे’, असा संदेश न्यायमंडळाने दिला आहे का ? अशी शंका वा संशय हिंदू समाजाच्या मनात निर्माण झाला आहे. असा प्रश्न करून आम्हाला न्यायमंडळाचा अपमान करायचा नाही, तर असा प्रश्न करण्यामागे ‘आम्हाला योग्य तो न्याय मिळेल किंवा नाही ?’, असा प्रश्न करून आम्हाला न्यायमंडळाकडे दाद मागायची आहे.
५. ‘हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत’, हे वारंवार सिद्ध करणार्या घटना
५ अ. हिंदु तरुणींना मुसलमान तरुणांनी फसवणे; पण त्या विरोधात कोणतीही कारवाई न होणे : सध्या हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची क्रौर्याने हत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुसलमान तरुण हिंदु मुलींना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांना जिवे मारतात. त्यांच्या विरोधात जर गार्हाणे नोंदवले, तर त्याची तात्काळ नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी कार्यकारीमंडळ तत्परतेने हालचाली करत नाही, असा अनुभव वारंवार येत आहे. कार्यकारीमंडळाची ही वर्तणूक ‘हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत !’, असे सांगणारी वाटते.
५ आ. हिंदूंना प्रतिकार केल्यास होणारा गवगवा ! : हिंदु सहिष्णू आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायचा नाही. त्यांनी ‘जर त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला, तर ते हिंसक होतात’, असा गवगवा करण्यास जगातील सर्व समाज मोकळे होतात. ‘हिंदू समाजावर होणारा अन्याय राज्यघटना आणि कायदा यांच्या मर्यादेत राहून केला आहे’, असे सांगण्यासाठीच देशातील कायदेतज्ञ, विद्वान, तत्त्वज्ञानी लोक पुढे सरसावतात. या सर्वांची कृती हिंदु समाजाला सांगते, ‘हिंदू केवळ अन्यायाचे मानकरी आहेत !’
६. हिंदु समाज रस्त्यावर उतरला, तर दोष कुणाचा ?
न्याय आणि कार्यकारी मंडळ यांनी एखाद्या समाजावर होणार्या अन्यायाला प्रतिबंध करण्याऐवजी अन्याय करणार्यांच्या पाठीशी जर या दोन्ही संस्था उभ्या राहिल्या, तर अन्याय सहन करणार्या समाजामध्ये असंतोष निर्माण होईल. मग शांतपणे जीवन जगणारा आणि अन्याय सहन करणारा समाज जर न्याय प्रस्थापित करण्यासाठी अन् फसवणुकीपासून, तसेच मृत्यूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरला, तर दोष कुणाचा?
७. न्याय अन् कार्यकारी मंडळ यांच्याकडून माफक अपेक्षा !
मुसलमान समाजाने दगडफेक करून अनेक वेळा कार्यकारीमंडळावर आक्रमण केले आहे. अशा परिस्थितीतही ‘मुसलमान समाजाकडून होणार्या विविध प्रकारच्या अपराधांकडे कार्यकारी आणि न्याय मंडळ जर दुर्लक्ष करत असेल, तर हिंदू समाजाच्या जीविताचे, त्यांच्या संपत्तीचे, त्यांच्या धार्मिक भावनांचे रक्षण कोण करणार ?’, असा प्रश्न हिंदू समाजासमोर उपस्थित राहिला आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर हिंदु समाजाला मिळत नसेल आणि तो समाज स्वसंरक्षणासाठी काही प्रयत्न करू लागला, तर न्याय अन् कार्यकारी मंडळ यांची कोणती भूमिका असेल ? हे त्यांनी स्पष्ट करावे. एवढी माफक अपेक्षा या दोन महत्त्वपूर्ण संस्थांकडून अशा परिस्थितीतही हिंदू समाज ठेवत आहे.
या देशातील शांतता आणि सुव्यवस्था टिकून रहावी, याचे संपूर्ण दायित्व कार्यकारी आणि न्याय मंडळ यांच्यावर आहे. त्यांनी त्यांचे दायित्व प्रामाणिकपणे निभावले, तर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि देशातली शांतता सुव्यवस्था अबाधित राहील; पण या दोन्ही संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी वर्ग या गोष्टीचा विचार करतो आहे, असे म्हणण्याचे धाडस होत नाही. म्हणून ‘हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत’, अशीच भावना हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न न करणार्या वृत्तीविषयी मनात दृढ होऊ लागते.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (२.८.२०२४)