पुणे येथे विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांचा ७५ वा जन्मदिन सोहळा पार पडला !
जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रम !
पुणे, ५ ऑगस्ट (वार्ता.) – येथील श्री स्वामी कृपा सभागृह, मयूर कॉलनी, कर्वेरोड, कोथरूड या ठिकाणी ४ ऑगस्ट या दिवशी विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम ७५ दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर विविध ऋचांचे मंत्रपठण केल्यावर पुरोहितांनी त्याचा उद्देश आणि अर्थ सांगितला. उपस्थित बालमित्र, नाडी भविष्य प्रेमी आणि मिलिटरीचे स्नेही यांनी गुणवैशिष्ट्ये सांगून ओक यांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यानंतर ‘ऑफिसर्स करीयर अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ सादर केला. आणखी एका नाटिकेतून त्यांचा जीवन प्रवास सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाला एअर मार्शल सुनीत सोमण (निवृत्त), मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त), ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, विंग कमांडर केळकर (निवृत्त), तोडकर, तबीब आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कालीचरण महाराज, चितळेबाबा, नाडीवाचक ईश्वरन् प्राचार्य अद्वयानंद गळतगे आदि मान्यवरांच्या उपस्थित चित्रफीत दाखवली, तसेच या वेळी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते.
सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !जमलेल्या आप्त, नातेवाईक, मान्यवरांनी ओक यांना विविध प्रकारे भेट वस्तू देऊन त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना भेट संच आणि भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. सनातन परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. |