खामगाव (बुलढाणा) येथे हिंदूंच्या निर्घृण हत्यांचा युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर निषेध !
उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
खामगाव (बुलढाणा) – उरणमधील कु. यशश्री शिंदे, तसेच धारावीमधील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या निर्घृण हत्येचा १ ऑगस्ट या दिवशी खामगाव येथील युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने निषेध करण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे, ‘‘हिंदूंच्या हत्यांमुळे हिंदु समाज क्षुब्ध झालेला आहे. या दोन्ही घटनांचा युवा हिंदु प्रतिष्ठान आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. आरोपीलासुद्धा कडक शासन व्हावे.’’
या वेळी युवा हिंदु प्रतिष्ठान, बजरंग दल, हिंदु राष्ट्र सेना यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धर्मबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.