यापुढे ‘लव्ह जिहाद’ला ‘जशास तसे’ उत्तर देणार ! – सुरेशसिंह राणा, कोकण प्रांत धर्म जागरण सहसंयोजक
समस्त बहुजन समाजाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली आणि निषेध सभा
नवी मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – यापुढे लव्ह जिहादला ‘जशास तसे’ उत्तर देण्यात येईल, असे प्रतिपादन कोकण प्रांत धर्म जागरण सहसंयोजक सुरेशसिंह राणा यांनी वाशी येथे केले. उरण येथील यशश्री शिंदे हिला धर्मांध दाऊद शेख याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर तिची निर्घृण हत्या केली. त्या विरोधात समस्त बहुजन समाजाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली आणि निषेध सभेच्या वेळी ते बोलत होते. विश्व हिंदु परिषद सामाजिक समरसता अभियान कोकण प्रांत सहप्रमुख कृष्णकांत बांदेकर, अधिवक्ता विशाल मोहिते यांच्यासह इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.
सुरेशसिंह राणा म्हणाले, ‘‘काही महिन्यांपूर्वी जिहादी मानसिकतेच्या धर्मांधाने हिंदु मुलीला मारले. तेव्हाही हा ‘लव्ह जिहाद’ नाही, असेच पोलीस सांगत होते. ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे आमच्याकडे येतात. उरण येथे घडलेली घटना हीसुद्धा त्याचाच एक भाग आहे. केवळ लोकसंख्या वाढवण्यासाठी धर्मांध हिंदु मुलीसमवेत प्रेमाचे नाटक करतात. लव्ह जिहाद, भूमी जिहाद करून हिंदु समाजावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु आता हिंदूही जागृत होत आहेत. या पुढे नवी मुंबईत लव्ह जिहादची घटना घडली, तर बलपूर्वक उत्तर देण्यात येईल. इतकेच नव्हे, तर अशा घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला समर्थन न करणार्या राजकीय पक्षाला हिंदू समर्थन देणार नाहीत. यापुढे अशी घटना घडल्यास आता मोर्चा, धरणे नाही, तर हिंदु समाज स्वतःच निर्णय घेईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’विरोधात कारवाई करायचे ठरवले, तर लव्ह जिहाद किंवा त्यातून होणार्या हत्या यांचा विचारही कुणी करू शकणार नाही.’’
मीना दरवेश म्हणाल्या की, यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या अगोदर नवी मुंबईत अशा स्वरूपाच्या ७ घटना घडल्या आहेत, पुढची पिढी कशी सुरक्षित रहाणार ? ही चिंतेची गोष्ट आहे.