सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यावर सूक्ष्मातील काही प्रयोग केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवणे

‘पू. दातेआजींच्या (पू. निर्मला दाते, वय ९१ वर्षे, सनातनच्या ४८ व्या संत) गंभीर आजारपणातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला अत्यंत अद्भुत आणि अनमोल असे सूक्ष्मातील जग अनुभवण्यास मिळत आहे. आमची पात्रता नसतांना गुरुमाऊली जे सूक्ष्मातील प्रयोग करवून घेत आहे, त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.

पू. निर्मला दातेआजी

१. पू. दातेआजींच्या मेंदूतील रक्तप्रवाहात रक्ताची गुठळी होणे आणि पुढे त्या बेशुद्धावस्थेत जाणे

४.५.२०२४ या दिवशी पू. दातेआजी यांच्या मेंदूतील रक्तप्रवाहात रक्ताची गुठळी निर्माण झाल्यामुळे त्यांची वाचा गेली. त्यानंतर हळूहळू त्यांचा उजवा हात आणि उजवा पाय यांतील शक्ती न्यून झाली. त्यामुळे त्यांना चालता येईना, तसेच त्यांना उजव्या हाताने काही उचलता येत नव्हते. त्यांची एम्.आर्.आय्. चाचणी (हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत भागाची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे) करून औषधोपचार चालू केले. एका मासात त्यांच्यात अत्यंत संथ गतीने थोडीशी सुधारणा होण्यास आरंभ झाला; परंतु ७.६.२०२४ या दिवशी पुन्हा त्रास होऊन त्यांना काही कळेनासे झाले. त्या एक प्रकारच्या बेशुद्धावस्थेत गेल्या. ८.६.२०२४ पासून त्यांना नाकातून घातलेल्या नळीद्वारे द्रव पदार्थ देण्यास आरंभ केला. काही वेळा त्यांच्या हृदयाच्या ठोक्याची वारंवारता (पल्स रेट) वाढली, तसेच ऑक्सिजनचा स्तर न्यून झाला. त्याला अनुसरून आधुनिक वैद्यांनी उपचार केले.

आजारी अवस्थेतील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांनी केलेले नामजपादी उपाय अन् त्याचे झालेले परिणाम

७.६.२०२४ या दिवशी रात्रीपासून प.पू. डॉक्टर स्वत: पू. आजींसाठी नामजपादी उपाय करू लागले. त्यांनी केलेले नामजपादी उपाय, प्रयोग, न्यास आणि नामजप यांतून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आरंभी गुरुदेवांनी स्वतः नामजपादी उपाय केले. त्यानंतर त्यांनी आम्हालाही नामजपादी उपाय करण्यास सांगितले. त्यानुसार आधुनिक वैद्य नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. निरंजन दाते आणि सौ. नेहा निरंजन दाते यांनी पाळीपाळीने नामजपादी उपाय केले. त्याची माहिती पुढील सारणीत दिली आहेत.

प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीचा लाभ करून घ्या !

प्राणशक्तीवहन उपाय करतांना साधिका

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्‍या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

 सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल, या दृष्टीने ही लेखमाला येथे प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

३. नामजपादी उपायांनी अडथळा दूर होणे

सौ. ज्‍योती दाते

पू. आजींसाठी नामजपादी उपाय करतांना प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘अडथळा कुठे आहे, त्यानुसार उपाय शोधणे आवश्यक आहे. उपाय केल्याने तो अडथळा दूर होईल.’’

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सांगितलेला प्रयोग आणि साधकांना जाणवलेली सूत्रे

प.पू. डॉक्टरांनी आमच्याकडून एक प्रयोग करून घेतला. त्यांनी आम्हाला पू. आजींच्या डाव्या हातावर खालून वर आणि वरून खाली हात फिरवण्यास सांगितले. त्या वेळी आम्हाला जाणवलेली सूत्रे पुढील सारणीत दिली आहेत.

– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), पुणे (१२.६.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक