निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट !
उमेदवारी रहित केल्याच्या विरोधात याचिका !
पुणे – निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवो आयोगाने) त्यांची उमेदवारी रहित केल्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेमध्ये ज्या संघटनांच्या वतीने खेडकर यांना नोटीस बजावली आहे, त्यांना पक्षकार करण्यात आले आहे. त्यानुसार यू.पी.एस्.सी., डीओपीटी, लबसना, पुण्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना पक्षकार बनवले आहे. त्यांनी ही याचिका ‘ऑनलाईन’ केली आहे. पूजा खेडकर यांचा पतियाळा न्यायालयाने (नवी देहली) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सतत खोटे बोलून आणि प्रमाणपत्रांमध्ये फसवणूक करून यू.पी.एस्.सी.ची परीक्षा दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. त्यांच्या विरोधात पुरावेही आढळल्याने पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांचा शोध घेत आहेत.