नवी मुंबईत ९ लाख ४५ सहस्र रुपयांचा गांजा जप्त !
दोघे अटकेत
नवी मुंबई – गांजा विक्रीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी वाजिद अब्दुल लतीफ खान आणि निहाल गागट यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ४५ सहस्र रुपयांचा २३ किलो ६२५ गांजा जप्त केला आहे.
शीव-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे २ युवक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना कह्यात घेतले. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकासमाजाला व्यसनाधीन करणार्यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! |