भिवंडी येथे धर्मांध उपाहारगृह चालकाचे अल्पवयीन मुलीशी असभ्य संभाषण !
ठाणे, ५ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी येथील एका मुसलमान उपाहारगृहचालक मालक रोएफ शेख याने उपाहारगृहात आलेल्या अल्पवयीन मुलीसमवेत बेशिस्तपणे संभाषण केले. ‘यापुढे तू मला पप्पा बोलत जा’, असे तो तिला म्हणाला. या प्रकरणी पीडितेची आई त्याला खडसावण्यासाठी गेल्यावर त्याने तिला शिवीगाळ करत तिच्यावर आक्रमण केले तिला सोडवण्यासाठी अन्य एक हिंदु गेला असता त्याच्यावरही हत्याराने आक्रमण करण्यात आले, तर दुसर्या हिंदूवर तळण्याच्या झार्याने आक्रमण केले. यात दोघे गंभीररीत्या घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
महिलेच्या तक्रारीवरून उपाहारगृहाचा मालक रोएफ शेख आणि वाढपी आलम, रियाज, विशाल, तसेच त्यांचे अन्य साथीदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|