पुणे येथे धर्मांधाचा एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार !
पुणे – शिक्षणासाठी पुणे येथे आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून ‘कॅब’चालक सलमानने बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. आरोपीच्या धमकीला घाबरलेल्या तरुणीने सदरची घटना खासगी वसतिगृहचालक आणि मैत्रिण यांना सांगितली. त्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या साहाय्याने कोंढवा पोलीस ठाण्यात सलमान विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडित तरुणी एका महाविद्यालयामध्ये कला शाखेत शिक्षण घेत आहे. ती एका खासगी वसतिगृहामध्ये रहाते. २ जून या दिवशी तरुणीने एका भ्रमणभाष अॅपद्वारे गाडी ठरवली होती. त्याचे पैसे ‘ऑनलाईन’ पद्धतीने दिले. त्यामुळे कॅबचालक सलमानला तिचा भ्रमणभाष क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर सलमानने संपर्क साधून तिच्याशी जवळीक केली. तिला बळजोरीने कोंढव्यातील एका खोलीमध्ये नेऊन तिची मासिक पाळी चालू असतांनाही बलात्कार केला. त्याचे भ्रमणभाषवर चित्रीकरण करून तिला धमकावले.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर ते चुकीचे वाटू नये ! |