मेरठ (उत्तरप्रदेश) येथे किरकोळ वादातून मुसलमानांनी केली हिंदु तरुणाची हत्या !
मेरठ (उत्तरप्रदेश) – मेरठमधील मवाना येथील किला बसस्थानकावर किरकोळ वादातून ४ मुसलमान तरुणांनी चहाचे दुकान चालवणार्या रोहित (वय २२ वर्षे) नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेनंतर मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करून रस्ताबंद केला. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी एकाला अटक केली आहे, तर उर्वरितांचा शोध घेत आहेत.
रोहित वडिलांसमवेत किला बसस्थानकावर चहाची टपरी चालवत असे. दुपारी ३ च्या सुमारास रोहितचे वडील घरी जेवायला गेले. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या ४ तरुणांनी रोहितच्या दुकानात जाऊन काही वस्तू ठेवण्यासाठी पॉलिथिनची पिशवी मागितली. यावर रोहित म्हणाला की, पॉलिथिन पिशवी नाही. यावरून तरुणांची रोहितसमवेत बाचाबाची झाली आणि आरोपींनी रोहितवर चाकूने अनेक वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिका
|