Congress Niranjan Hiremath : माझ्या मुलीला आमच्या (काँग्रेसच्या) पक्षाच्या नेत्यांनीच मारले ! – वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील नेहा हिरेमाठ हिच्या हत्येचे प्रकरण
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील बीव्हीबी महाविद्यालय परिसरात १८ एप्रिल २०२४ या दिवशी विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची फैयाज याने एकतर्फी प्रेमातून हत्या केली होती. ‘राजकीय कटातून माझ्या मुलीची हत्या झाली असून १०० टक्के आमच्या (काँग्रेस) पक्षाच्या नेत्यांनी हत्या केली आहे’, असा गंभीर आरोप नेहा हिचे वडील असणारे काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी केला आहे. ‘या घटनेत अदृश्य हात काम करत आहेत आणि कट रचत आहेत’, असा दावाही त्यांनी केला.
‘या प्रकरणाविषयी जलद गती न्यायालयाची आवश्यकता नाही’, असे गृहमंत्री परमेश्वर यांनी म्हटल्यामुळे निरंजन हिरेमठ यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, गृहमंत्र्यांचे वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटले आणि तितकेच दु:खही झाले. सरकारच्या पत्रानुसार ते जलद गती न्यायालय स्थापन करणार होते. मुख्यमंत्री, कायदामंत्री यांनी घरी येऊन मला सरकारचे पत्र दाखवले होते. नेहाची हत्या होऊन ३२ दिवस झाले असतांना सांत्वन करण्यासाठी आलेले गृहमंत्री परमेश्वर यांनी न्याय देण्याची हमी दिली होती. आता ‘जलद गती न्यायालयाची आवश्यकता नाही’, असे सांगत कोलांटी उडी मारली आहे. यामुळे समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे ? आरोपीला साहाय्य केल्यामुळे तुम्हाला काय लाभ होत आहे ? राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार वागावे, हीच माझी मागणी आहे. आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. हत्येच्या प्रकरणाचे आरोपपत्र मला अद्याप मिळालेले नाही. आरोपपत्रामध्ये फेरफार झाल्याचा संशय आहे. मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रकरणी बोलेन.
संपादकीय भूमिकानिरंजन हिरेमठ काँग्रेसचे नगरसेवक आहेत आणि ते असे बोलत आहेत. यावरून कर्नाटकातील काँग्रेस सरकार मुसलमान आरोपीला कसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते ! स्वतःच्या नगरसेवकाला मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी न्याय न देणारी काँग्रेस हिंदूंवर अन्यायच करणार ! |