NIA : एन्.आय.ए.कडून दोघांविरुद्ध आरोपपत्र !
|
बेंगळुरू – कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांनी जुलै २०२२ मध्ये धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्तफा पैचार याला आश्रय दिल्याच्या प्रकरणी दोघांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) नुकतेच आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांपैकी मुस्तफा पैचार हा हत्येच्या कटाचा प्रमुख आरोपी आहे. त्याला रियाज एच्.वाय. याने आश्रय दिला होता. एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी रियाजला देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना गेल्या महिन्यात अटक केली होती. त्याच्यासह आणखी एका आरोपीच्या विरोधात एन्.आय.ए.कडून आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी ७ आरोपी अद्याप पसार आहेत.