साधकांनो, अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !
साधकांना सूचना
‘सनातनचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्या आहेत. या वाईट शक्ती साधना आणि समष्टी सेवा करणार्या साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. या त्रासांमधील एक प्रकार म्हणजे गेल्या काही दिवसांपासून साधकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, उदा. वाहन चालवत असतांना ते घसरून पडल्यामुळे दुखापत होणे, प्रसाधनगृहात किंवा अन्यत्र पाय घसरून पडल्यामुळे अस्थीभंग होणे किंवा घायाळ होणे आदी प्रकारच्या त्रासांमुळे साधकांना अनेक दिवस विश्रांती घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना गुरुकार्य करण्यात अडचणी येत आहेत. वाईट शक्तींनी साधकांना कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी ईश्वर वाईट शक्तींपेक्षा अनंत पटींनी सामर्थ्यवान असल्यामुळे तो साधकांचे रक्षण करणारच आहे. साधकांनी मात्र वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय वाढवणे अत्यावश्यक आहे.
विविध प्रकारच्या अपघातांपासून रक्षण होण्यासाठी साधकांनी उपास्य देवतेला प्रार्थना करावी आणि वैयक्तिक नामजपासह पुढील नामजप करावा.
१. नामजप : महाशून्य
२. न्यास : ओठांच्या समोर १ – २ सें.मी. अंतरावर उजव्या हाताचा तळवा धरणे
३. कालावधी : ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रतिदिन १ घंटा करावा
सर्व साधकांनी वरील नामजप पुढील २ मास प्रतिदिन १ घंटा केल्यावर त्याच्या परिणामाचा आढावा घेण्यात येईल आणि ‘पुढे हाच नामजप ठेवायचा कि पालटायचा ?’, ते ठरवून साधकांना पुन्हा सूचना देण्यात येईल.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.८.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |