Madrasa teacher raped an orphan : मदरसा शिक्षक मौलाना चांद महंमद याने अनाथ विद्यार्थिनीवर अनेक वेळा केला बलात्कार !
|
शामली (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका मदरशात शिकवणारा मौलाना (इस्लामचा अभ्यासक) चांद महंमद याच्यावर लहान मुलांशी गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. तो त्याच्या गुप्तांगाची मालिश करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना सांगत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्याने एका अनाथ विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याचाही आरोप आहे. या घटनेनंतर मदरसा संचालकाच्या साहाय्याने मौलाना पसार झाला आहे. दुसरीकडे पोलीस या घटनेला मुलांमधील आपापसांतील भांडण असल्याचे म्हणत आहेत. (अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत नाही ना, हे उत्तरप्रदेशातील भाजपच्या गृहमंत्रालयाने पाहिले पाहिजे, असेच लोकांना वाटते ! – संपादक)
१. जिल्ह्यातील मुमताजनगरच्या गुराना गावात ‘जामिया अरेबिया तालिमुल कुराण’ नावाचा मदरसा आहे.
२. अभ्यास संपल्यानंतर मदरसा शिक्षक मौलाना चांद महंमद विद्यार्थ्यांना त्याच्या खोलीत बोलावत असे. येथे तो मुलांकडून त्याच्या गुप्तांगाला मालीश करून घेत असे. तसेच विद्यार्थिनींची छेड काढत असे. कुकर्म केल्यानंतर तो मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तोंड बंद ठेवण्यास सांगत असे.
३. काही विद्यार्थ्यांच्या परस्पर संवादातून ही बातमी गावभर पसरली. या घटनेवर गावकर्यांनी संताप व्यक्त करण्यास आरंभ केल्याने मदरसा संचालक इस्रायलने मौलाना चांद महंमद याला गुपचूप पळून जाण्यास साहाय्य केले.
४. यासंदर्भात पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवेश कुमार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, पोलिसांकडे तोंडी तक्रार आली होती. या तक्रारीची चौकशी केली असता हे मुलांमधील अंतर्गत वादाचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले.
५. गावकर्यांचे मत मात्र पोलिसांपेक्षा वेगळे आहे. मदरसा संचालक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संपादकीय भूमिका
|